बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

याने पुरण घट्ट शिजेल

* पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते.
* पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात.
* पुरण शिजताना हरभर्‍याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की, पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो.
* काजू व इतर ड्राय फ्रूट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लवंगा टाका.
* कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात.