मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:03 IST)

घरी शुद्ध तुप बनविण्याची सोपी पद्धत

* गायीचे एक लिटर दूध उकळून थंड होऊ द्या.
* खोलीच्या तापमानावर त्यात एक चमचा दही घाला.
* रात्रभर झाकून ठेवा.
* सकाळी दह्यावरील साय काढून बाजूला ठेवा. साय फ्रीजमध्ये ठेवा.
* सात दिवस या प्रकारे मलई गोळा करा.
* सात दिवसांनी फ्रीजमधून बाहेर काढा, खोलीच्या तापमानावर येईपर्यंत वाट बघा.
* 10-15 मिनिटे ब्लेंड करुन घ्या.
* ब्लेंड करताना दोन वाट्या गार पाणी मिसळा.
* फेस बाहेर यायला लागल्यावर बारीक चाळणीतून गाळून घ्या.
* उरलेले लोणी चाळणीत चार ते पाच पाण्याने धुऊन घ्या.
* आता एका जड तळाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात लोणी घ्या आणि मंद आचेवर ठेवा. 
* लोणी वितळेल आणि पांढर्‍या फेसाप्रमाणे दिसेल.
* आता सतत ढवळत राहा, फेस पातळ होऊ लागेल आणि तळाशी हलक्या रंगाचे तूप दिसू लागेल. 
* सोनेरी होईपर्यंत गॅसवर ठेवा.
* ते थंड झाल्यावर पारदर्शक तूप गाळून एका बरणीत वापरण्यासाठी ठेवा.

Edited by: Rupali Barve