बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जून 2022 (14:16 IST)

Marathi Joke : Old People Are Not Stupid

joke
एक मुलगी आपल्या म्हाताऱ्या आजीसोबत गप्पा मारीत घराच्या ओसरीवर बसली होती. तेवढ्यात तिचा ''बॉयफ्रेंड'' तिच्या घरी तिला भेटायला आला !
 
त्याला आलेलं पाहून मुलीनं त्याला विचारलं, " अरे, तुम्ही ''रामपाल यादव'' लिखित पुस्तक Dad Is At Home आणलंय कां ?
 
बॉयफ्रेंड, "नाही मी तर तुझ्याजवळचं ''कमल आनंद'' यांचं Where Should I Wait For You हे पुस्तक वाचायला नेण्यासाठी आलोय!"
 
मुलगी, "नाही माझ्यापाशी ते पुस्तक नाही, माझ्यापाशी 'प्रेम बाजपेयी' यांचं Under The Mango Tree हे पुस्तक आहे !"
 
बॉयफ्रेंड, "ठीक आहे, तू येताना  ''आनंद बक्षी'' यांचं Call You In Five Minits हे पुस्तक घेऊन ये!"
 
"बरं" मुलगी म्हणाली. मग मुलगा मुलीच्या आजीच्या पाया पडून निघून गेला. !
 
आजी म्हणाली, "बेटा, हा मुलगा खरंच इतकी सारी पुस्तकं कशी काय वाचत असेल नै ?
 
मुलगी, "आजी, हा आमच्या वर्गातला सर्वात शहाणा आणि अतिशय Intelligent मुलगा आहे !"
 
आजी, "हो का? मग त्याला 'मुंशी प्रेमचन्द' यांचं Old People Are Not Stupidहे पुस्तकही एकदा वाचून घे म्हणावं ! ..."