शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (18:03 IST)

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे  कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
 
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
 
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
 
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
 
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही,
 अन होशील माझी कधी तरी