शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (10:55 IST)

Love Shayari नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला

love poetry
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.
 
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
 
तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे 
तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे.
 
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
 
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
 
तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की, 
राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं.
 
जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं 
तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा.
 
आपल्या टेन्शनवर एकच रामबाण उपाय
आपल्या प्रेयसीचा फक्त एक कॉल
तो आला की, सर्व काही होते गायब
जसं आधी काही झालंच नाही
 
जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर 
तसे मला आयुष्याचा प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर.