1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह शायरी

तुझ्याच साठी

- अनंत बावने

तुझ्याच साठी
ND
सजलो तुझ्यासाठीच
हसलो तुझ्यासाठी ।।
खेळात रंगतांना
हरलो तुझ्यासाठीच.....

नशिबात व्हायचे ते
मी भोगले कधीचे ।।
चटके उन्हातले मी
साहतो तुझ्याचसाठी.....

जेव्हा कधी तुझ्याशी
वाटे रमून जावे ।।
तुडवित खाच खळगे
येतो तुझ्याचसाठी ....

जाऊ नको मला तू
सोडून दूरदेशी ।।
जे मागशील मजला
देतो तुझ्याचसाठी...

स्वप्नातल्या सुखांना
सजवू नको कधीही ।।
प्रत्यक्ष मीच आता
येतो तुझ्यासाठीच...

आला वसंत फुलूनी
बहरात यौवनांच्या ।।
हृदयातल्या गीतांना
गातो तुझ्यासाठी....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा