बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमगीत
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (16:12 IST)

भाव माझ्या मनातले त्यास ओळखू येत असेल का?

भाव माझ्या मनातले त्यास ओळखू येत असेल का?
डोळ्यात डोकावून त्यानं बघितलं तरी का?
आधी असलेला अपार विश्वास अन प्रेम,हरवलं!
त्यानं त्याच्याच मुळे कदाचित ते गमावलं!
खोटे भाव आणून दाखवू तरी का मी?
वाचता येतं असेल खरंच त्याला, तर समजावं स्वतः नी!
आता न येणे परतून "तो" हे निश्चित आहे,
गमावलेल्या व्यक्ती चा विश्वास मिळवणं कठीण आहे.
असंच चालत असावं आजूबाजूला कदाचीत,
ते बघूनच तो ही शिकला असावा खचित!
चालतं य तेवढं चालवा प्रवास असाही,
मार्ग वेगळे करता येतात,ज्यास त्यास केव्हाही!
....अश्विनी थत्ते