1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (21:32 IST)

असाच आहे बाई माझा सखा श्रावण !

sharawan
आलास का रे, माझ्या घना,
सोबतीनं श्रावणा चा महिना,
सावळे रूप, त्याचे ही आहे,
सखा हा, पण जरा लहरी आहे,
दर्याखोऱ्यातून हुंदडतो, बघ कसा!
वेड जीवा लावितो प्रियकर जसा!
न कळे त्यात आहे खास काय ते?
नाव घेताच त्याचे, गाली हसू फुटते!
जावे वाटे त्याच्या संगतीने कुठंवर ही,
मन म्हणे फक्त त्याचीच सोबत मज हवी!
गीत ओठावर नकळत येते, गाते गाण!
असाच आहे बाई माझा सखा श्रावण !
...अश्विनी थत्ते