अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीतीइथे सुरु होण्याआधी संपते कहाणी साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणीजखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गातीसर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावेमीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावेएकदाच आभाळाला अशी भिडे माती गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटेअसे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटेतरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानीगूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती