शोध, कधी न संपलेला..!
वेबदुनिया
प्रसिद्ध रशियन लेखक लियो टॉलस्टॉय यांनी अठराव्या शतकात एक कांदबरी लिहिली होती. ती कादंबरी म्हणजे 'अन्ना कारेनिना'होय. एका विवाहित महिलेचा प्रेमाच्या दिशेने प्रवास व इच्छित स्थळी पोहचल्यावर तिचा करूण अंत हा या कादंबरीचा विषय आहे. प्रेमाचा शेवट दोन प्रकारे होत असतो. एक म्हणजे आनंददायी आणि दुसरा दुःखद. हीच या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे. त्या काळी समाजात स्त्रीने प्रेम करणे हा गुन्हा समजला जात होता. त्यात विवाहीत महिलेने कोण्या पुरूषावर प्रेम केले तर तो स्त्री जातीसाठी मोठा कलंक मानला जात होता. मात्र, कांदबरीची नायिका अन्ना कारेनिना हिने त्या काळच्या प्रथांना झुगारून प्रेम करण्याचा गुन्हा केला होता.अन्नाचे लग्न तिच्यापेक्षा तब्बल 20 वर्षे मोठ्या काउंट कारेनिन नामक व्यक्तीशी झाले होते. त्याचा सेर्योझा नावाचा एक लहान मुलगाही होता. सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या अन्नाच्या आयुष्यात कधी भरणारी एक रिकामी जागाही होती. आणि ती म्हणजे प्रेम ! जीवनात न मिळालेले प्रेम शोधण्याच्या प्रयत्नात अन्ना होती. एके दिवशी रेल्वेने प्रवास करत असताना व्रोन्स्कीशी तिची भेट झाली. तोच तिच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉंईंट' ठरला. |
पतीने व समाजाने कलंकीत ठरवलेल्या अन्नाला आत्महत्या करण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक नसतो. शेवटी जीवनाला कंटाळून अन्ना रेल्वेखाली आत्महत्या करते. अन्नाचे जीवन संपते. पण प्रेमाचा शोध मात्र कधीच संपत नाही. |
|
|
सुरवातीला अन्नाला ब्रोन्स्की मुळीच आवडत नाही. मात्र हळू-हळू त्याच्या गप्पामध्ये अन्ना रमते. त्याचा सहवास तिला आवडायला लागतो. अन्नाच्या मनात ब्रोन्स्कीविषयी भावना फुलायला लागतात. त्याच्याबद्दलच्या प्रेमाच्या कल्पनांची दिवास्वप्ने ती रंगवू लागते. तिला प्रेमाची जाणीव व्हायला लागते. दोघांमधील प्रेमाचा गुलकंद मुरतो व अधिक गोड होतो. व्रोन्स्कीपासून अन्नाला एक अपत्य होते. मात्र,त्यांच्यातील प्रेम अन्नाच्या पतीला मान्य होत नाही. तिच्या या बाहेरख्यालीपणाने आपली सामाजिक प्रतिष्ठा मातीत मिसळली जातेय असे त्याला वाटते. तो तिला व्रोन्स्कीपासून दूर राहण्याची ताकीद देतो. त्यासाठी ब्रोन्स्कीपासून झालेले अपत्यही स्वीकारायला तयार होतो. अन्नाने प्रेमासाठी पती व संपूर्ण समाजविरूध्द बंड फुकारलेले असते. आता तेच प्रेम तिला दु:खा व्यतिरिक्त काहीच देऊ शकत नाही. पतीने व समाजाने कलंकीत ठरवलेल्या अन्नाला आत्महत्या करण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक नसतो. शेवटी जीवनाला कंटाळून अन्ना रेल्वेखाली आत्महत्या करते. अन्नाचे जीवन संपते. पण प्रेमाचा शोध मात्र कधीच संपत नाही.