सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (08:30 IST)

प्रेमभंग किंवा ब्रेकअप झाले असल्यास हे करा

असं म्हणतात की जेव्हा एखादा प्रेमात पडतो तेव्हा त्याला आपल्या अवतीभवती प्रेमच दिसते.सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे प्रेमीयुगल एकमेकांना भेटू शकत नाही.त्यांची भेट म्हणजे सध्या ऑनलाईनच होत आहे.दूर असल्यामुळे या नात्यात दुरावा येणं देखील साहजिक आहे.त्यामुळे प्रेमभंग होत आहे.प्रेमभंग किंवा ब्रेकअप झाल्यावर प्रेमी युगल जोडप्यांना एकटे वाटते.त्यांना काहीच आवडत नाही.काही तर नको ते पाऊले देखील उचलतात.असं  होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण स्वतःची काळजी घेऊ शकता.चला जाणून घेऊ या.
 
* मित्रांशी बोला-लॉकडाऊन मध्ये ब्रेकअप झाले आहे आणि लॉक डाउन असल्याने आपण कुठेही जाऊ शकत नाही.तर या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपले मित्र आपली मदत करू शकतात.त्यांच्याशी बोला आपले मन हलके होईल.आणि प्रेमभंगाच्या वेदनेतून बाहेर पडण्यात देखील मदत मिळेल.
 
* स्वतःला एकटे ठेऊ नका-बरेच लोक ब्रेकअप झाल्यावर स्वतःला एकटे करतात असं करू नका.असं केल्याने आपण तणावात जाऊ शकता.सगळ्यांसह राहा.आपल्याला चांगले वाटेल.
 
* कुटुंबासमवेत वेळ घालवा- असं म्हणतात की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपले कुटुंबातील सदस्यच आपला साथ देतात.ब्रेकअप झाले असल्यास आपला वेळ आपल्या कुटुंबियांसमवेत घालवावा. त्यांच्याशी बोला,त्यांच्यासह खेळ खेळा.असं करून आपण स्वतःला व्यस्त ठेवा.असं केल्याने आपल्याला छान वाटेल. 
 
* गोष्टी शेयर करा-ब्रेकअप झाल्यावर देखील काही लोक काहीच सामायिक करत नाही.सर्व शेयर करत नाही.घरातील सदस्यांना काही सांगायचे नसेल तर सांगू नका.पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणी असत ज्याला आपण सर्वकाही शेयर करतो.त्याला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगा.