1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बेलग्रेड , शनिवार, 29 मे 2021 (14:35 IST)

कारकिर्दीतील 952 व्या विजयासह जोकोविच उपान्त्यफेरीत दाखल

Djokovic
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिस खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरियाचा पराभव करत बेलग्रेड ओपन टेनिस टुर्नामेंटच्या उपान्त्यफेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने जागतिक क्रमवारीत 96 व्या स्थानी असलेल्या कोरियाचा 6-1, 6-0 ने पराभव करत 56 मिनिटांतच सामना आपल्या नावे केला.
 
जोकोविचच्या कारकिर्दीतील हा 952 वा विजय ठरला. उपान्त्यफेरीत आता जोकोविचचा सामना आपल्याच देशाच्या लाजोविच किंवा क्वालिफायर आंद्रेज मार्टिन याच्याशी होईल. या हंगामात जोकोविचचे रेकॉर्ड 18-3 असे आहे. याअगोदर जोकोविचने जागतिक क्रमवारीत 253 व्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या मॅट्‌स मोराइंगचा सलग सेट्‌समध्ये 6-2, 7-6(4) पराभव केला होता.