1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (13:13 IST)

ऑस्ट्रेलियन ओपनवर जोकोविचने नाव कोरले

Djokovic
रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचने डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर आपले नाव कोरले. जोकोविचने मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकाने पराभव केला. त्याचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे विक्रमी नववे विजेतेपद ठरले.
 
चौथ्या मानांकित ेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. पुन्हा एकदा हुलकावणी दिली असून, तो मरात सॅफिननंतर ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.