बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (16:14 IST)

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी

काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. यासाठी चॉकलेटमध्ये कोकोआचे प्रमाण किमान 60 ते 75 टक्के असावं. खरं तर चॉकलेटचे मूल घटक कोकोआमध्ये सामील एंटीऑक्सीडेंट्स रक्त प्रवाह सुरळीत करतं ज्याने ब्लड सर्कुलेशन शरीरातील प्रत्येक आवश्यक भागात पोहचतं. या प्रकारे एनर्जी तर मिळतेच आणि प्रेम संबंध देखील सुधारतात. 
 
डॉर्क चॉकलेटने आपलं मूड व ब्लड सर्कुलेशन सुरळीत होत असून सोबतच ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, प्रीमॅच्योर डेथ, कोरोनरी डिजीजच्या धोक्यापासून देखील बचाव होतो. डार्क चॉकलेटमध्ये असे पदार्थ असतात ज्याने मूड आणि ऊर्जेला प्रभावित करतं.
 
चॉकलेटमध्ये आढळणारं L-arginine नावाचं अमीनो अॅसिड महिला आणि पुरुष दोघांसाठी प्रभावी असतं. याने नैसर्गिकरीत्या प्रेमाप्रती इच्छा निर्माण होते. डार्क चॉकलेट मेंदूत सेरोटोनिन आणि डोपामाइनचं स्तर वाढवतं ज्याने सेवन करणार्‍याला आनंदाची अनुभूती होते त्यामुळे मूड चांगलं राहतं. डार्क चॉकलेटमध्ये phenylethylamine असल्याने हे मेंदूत तयार होणार्‍या केमिकलसारखं असतं. हे उत्पन्न झाल्यावर आपण प्रेमात आहोत असं वाटू लागतं. फेनिलेथिलामाइन एंडॉर्फिन रिलीज होण्यात मदत करतं ज्याने आपला मूड चांगलं राहतं. 
 
डार्क चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन कम्पाउंड आढळत ज्याने हे एफ्रोडिसिएक गुण असलेलं खाद्य पदार्थ बनतं. थियोब्रोमाइन सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर काम करतं ज्याने आपण ऊर्जावान आणि उत्साहित राहण्यास मदत होते.