मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (09:00 IST)

आपल्या व्यस्ततेमुळे कुटुंबातील सदस्य रागावले आहेत,अशा पद्धतीने त्यांचा राग घालवा

आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात प्रत्येकजण हा व्यस्त आहे.कोणाला ही विचारल्यावर तो सध्या अजिबात वेळच मिळत नाही असं म्हणत असतो.या व्यस्त जीवनामुळे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला देखील वेळ मिळत नाही.एवढेच नव्हे तर कामाच्या व्यस्ततेमुळे घरातील इतर सदस्यांकडे देखील लक्ष देणे जमत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.आणि घरात वाद होऊ लागतात.या मुळे घरातील मुलं,आई-वडील,जोडीदार यांना असं वाटत असत की आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष करत आहात.त्यामुळे ते आपल्यावर रागावतात.आपण त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी काही टिप्स अवलंबवू शकता जेणे करून आपण आपल्या माणसांचा राग शांत करू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 
 
1 बाहेर फिरायला घेऊन जावे-आपण आपल्या नाराज झालेल्या कुटुंबियांना फिरायला बाहेर नेऊ शकता.आता अनलॉक झाल्यामुळे आपण त्यांना कुठे ही बाहेर फिरायला नेऊ शकता.जर वयोवृद्ध असल्यामुळे आपण आई-वडिलांना बाहेर नेऊ शकत नाही तर आपण घरातच बसून कुटुंबियां समवेत बसून जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.असं केल्याने मुलांना,जोडीदाराला,आणि आई-वडिलांना चांगले वाटेल आणि त्यांचा राग देखील शांत होईल.
 
 
2 डिनरला घेऊन जा- आपण आपल्या कुटुंबियांसह डिनरचा बेत देखील आखू शकता.आपण त्यांच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाऊन डिनर करू शकता किंवा आपण आपल्या मुलांच्या,जोडीदाराच्या,आई-वडिलांच्या आवडीचा जेवण्याचा मेनू ठरवून घरातच डिनर करू शकता.असं केल्याने त्यांचा राग देखील दूर होईल. 
 
 
3 आठवड्यातून एक दिवस कुटुंबासाठी -आपल्या कुटुंबियातील सदस्य मग ते मुलं असो,पत्नी असो,किंवा आई-वडील असो.प्रत्येकाची इच्छा असते की आपण त्यांच्या समवेत वेळ घालवावे.जर आपण कामात व्यस्त आहात,तर आठवड्यातून किमान एक दिवस (सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशी) आपण त्यांच्या समवेत वेळ घालवू शकता.हा संपूर्ण दिवस आपण त्यांच्या समवेत घालवू शकता.या मुळे आपल्या कुटुंबीयांचा देखील आपल्यावर असलेला राग कमी होईल.
 
 
4 त्यांना आवडीच्या भेटवस्तू देऊन -आपण व्यस्ततेमुळे कुटुंबियातील सदस्यांना वेळ देऊ शकत नाही,या मुळे घरातील मंडळी रागावले आहेत,तर आपण त्यांना काही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊन त्यांचा राग घालवू शकता.भेटवस्तू घेणं कोणाला आवडणार नाही. अशा मध्ये आपण त्यांना भेटवस्तू दिल्याने त्यांचा राग दूर होईल.