राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आजपासून मराठवाड्यात परिवार संवाद दौरा
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आजपासून मराठवाड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा सुरू होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री धनंजय मुंडे हे ही या दौ-यात त्यांच्या समवेत पूर्ण वेळ राहणार आहेत.
आज गुरुवार दिनांक 24 रोजी तुळजापूर येथून त्यांच्या या दौ-याची सुरुवात होणार असून आज दिवसभरात ते उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील व जिल्हा कार्यकारणी चा आढावा बैठक घेणार आहेत.
याशिवाय श्री जयंत पाटील हे जलसंपदा विभागाची बैठक घेणार आहेत तर धनंजय मुंडे ही सामाजिक न्याय खात्याचा जिल्हा आढावा घेणार आहेत. चार जुलैपर्यंत हा दौरा असणार आहे, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ते जाणार आहेत.