शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (17:13 IST)

खूप प्रेम असलं तरी दर्शवणे देखील गरजेचे

जगात सर्वात सुंदर नातं आहे प्रेमाचं. बदलत असलेल्या जीवनशैलीत एकमेकांसोबत राहणे कठिण होत असलं तरी खरं प्रेम हवं असल्यास किंवा खरं प्रेम टिकून राहावं यासाठी एवढी काळजी तरी आपण घेत आहात हे निश्चित करावे.
 
एकमेकांवर खूप प्रेम करणे आणि ते दर्शवणे देखील गरजेचे आहे.
एकमेकांशी खोटं बोलणे टाळा.
चर्चा व्हावी वाद नको.
एकमेकांप्रती उदार आणि मधुर व्हा.
पार्टनरने हर्ट केल्यास माफ करण्यात वेळ घेणे योग्य नाही.
कधीही ब्रेक-अप शब्द चुकूनही तोंडातून काढू नये.
सॉरी म्हणताना आपली वागणूक तशीच असावी.
प्रेमात इगो नसावा.
कधीही 'इट्स ओके' तोपर्यंत म्हणून का जोपर्यंत मनापासून 'ओके' वाटत नसेल.
वर्तमानाची तुलना अतीतशी करणे योग्य नाही.
पार्टनरशी तुलना एक्ससोबत करू नये.
पार्टनरकडून घेण्यापेक्षा देण्यावर भर असावा.
पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये.
कोणत्याही वाद वाढण्यापूर्वी आटोक्यात घ्या. वाद दुसर्‍या दिवसापर्यंत जाऊ देऊ नका.
जगात कोणीही परिपूर्ण नाही म्हणून अती अपेक्षा धरून चिडचिड करण्याचा काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात असू द्यावं.