बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (20:42 IST)

Online Dating: ऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा

आजकालसर्व काही डिजिटल होत आहे. प्रेम देखील डिजिटल होत आहे. याचा अर्थ ऑनलाइन डेटिंगचा काळ आहे, जिथे लोक त्यांच्या जोडीदाराला इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांद्वारे भेटतात आणि नंतर त्यांचे प्रेम आणि नाते येथून सुरू होते. ऑनलाइन डेटिंग आणि पार्टनर शोधण्यासाठी अनेक ऑनलाइन डेटिंग अॅप्स उपलब्ध आहेत.कोरोनाच्या काळात ऑनलाइन डेटिंग अॅप्सची मागणी आणखी वाढली.पण काही गोष्टींचे फायदे आहे तर काही तोटे पण आहेत. असे अनेक लोक आहेत जे डिजिटल डेटिंगद्वारे फसवणुकीचे बळी ठरले. ऑनलाइन डेटिंग अॅप आणि फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, फसवणुकीला बळी पडू नये या साठी ऑनलाइन डेटिंगदरम्यान फसवणूक टाळण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेऊ या.
 
ऑनलाइन डेटिंग करताना फसवणूक टाळण्याचे मार्ग-
 
* ऑनलाइन प्रोफाइल ठेवा सुरक्षित
ऑनलाइन डेटिंगसाठी सोशल मीडिया खाते किंवा ऑनलाइन प्रोफाइल वापरता. अशा परिस्थितीत, जेव्हाही आपण प्रोफाइल तयार करता तेव्हा त्यामध्ये वैयक्तिक माहिती शेअर करू नये याकडे लक्ष द्या. फोन नंबर, ईमेल आयडी किंवा प्रोफाईलवरील इतर माहिती सर्वांशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला डेट करत आहात त्याच्याशी वैयक्तिक माहिती विचारपूर्वक शेअर करा.
 
 
* नकार द्या -
जेव्हा लोक ऑनलाइन डेटिंग करू लागतात किंवा एखाद्याशी ऑनलाइन चॅटिंग करू लागतात, तेव्हा अनेकदा समोरची व्यक्ती असे काहीतरी करण्यास सांगते किंवा वैयक्तिक माहिती विचारते, जी आपण  त्याच्यासोबत शेअर करणे सोयीचे समजत नाही. पण नातेसंबंध बिघडू नये या साठी त्याच्या सर्व गोष्टी मान्य करता. हे अजिबात करू नका. जर  एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थता किंवा शंका वाटत असेल तर नकार द्या.
 
*विचारपूर्वक निर्णय घ्या-
लोक सहसा ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर जोडीदार शोधण्याची घाई करतात. जर त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्यासाठी अनुकूल किंवा योग्य जोडीदार सापडला तर घाईघाईने ते काही पावले पुढे जातात. असे करू नका. जरी ऑनलाइन वर एखादी व्यक्ती आवडली असल्यास त्यांनाअधिक जाणून घेण्यासाठी वेळ घ्या. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या. याबाबत कुटुंबीयांचे आणि मित्रांचे मत जाणून घ्या
 
* सावधगिरी बाळगा- 
 एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटता तेव्हा सावधगिरी बाळगा, तुम्ही लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे नियम ऑनलाइन डेटिंगला देखील लागू होते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणीतरी आवडले असल्यास आणि ऑनलाइन चॅटनंतर सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटायचे असल्यास  कधीही एकटे जाऊ नका. त्यापेक्षा  कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्राला  सोबत घेऊन जा.