गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (13:23 IST)

असे Boyfriend धोकादायक, महिलांनी अशा पुरुषांपासून सावध रहावे !

love
अनेक पुरुष खूप आकर्षक असतात, अगदी पहिल्यांदा बघितल्यावर आपोआप त्यांच्याप्रती आकर्षण वाटू लागतं. ते अगदी परिपूर्ण आणि मैत्रीपूर्ण दिसू शकतात, परंतु ते पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्वाचे चित्रण करत असतील असे देखील असू शकतं. कारण स्मार्ट पुरुष सुरुवातीला मिस्टर राईट असल्याचे चित्रित करतात. रोमँटिक नात्यात पडण्यापूर्वी धोकादायक लोकांपासून स्वत:ला जपून ठेवणे गरजेचे आहे.
 
परफेक्ट एलिजिबल बॅचलर बघून तो अजून सिंगल कसा? याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी हा विचार मुली बाजूला ठेवतात कारण त्या स्वतःला खूप खास समजतात किंवा समोरचा तुम्हाला विश्वासात घेतो. अशा प्रकारचे पुरुष तुम्हाला त्यांचे परिपूर्ण जीवन, वागणूक, नोकरी, आकर्षण इत्यादींनी मोहित करतील. पण जेव्हा गोष्टी वाढू लागतात, परिस्थिती गंभीर होऊ लागेल ते पटकन तुमच्यापासून पळ काढू शकतात.
 
लग्नासाठी तयार पुरुष देखील सहज सापडतात तेव्हा त्यांना फक्त लग्नाची घाई असते. या प्रकारचे पुरुष नेहमीच पहिल्यांदा लग्न करण्यास तयार असतात. ते लग्न ही एक साधी प्रक्रिया मानतात जी कुठेही, कधीही होऊ शकते. पण अशात प्रणय आणि हनिमूनचा टप्पा ओसरला की त्यांचा स्वभाव बदलत राहतो. अशा लोकांपासून नेहमीच सावध राहण्याची गरज आहे.
 
तुमच्या पैशावर प्रेम करणारे पुरुष ओळखल्यावर त्यापासून लांब राहा. या प्रकारचा माणूस नातेसंबंधात सोयीस्कर झाल्यावर तुमच्या पैशावर अवलंबून असतो. त्याचं तुम्हाला आकर्षण वाटत असेल म्हणून तुम्ही अनेकदा त्याचे खर्च ही भागवाल परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि ते फक्त तुमच्या कमाईवर जगण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
मम्मा बॉयज किती जरी क्यूट वाटत असेल पण शेवटी आईशिवाय कोणाचेच ऐकत नाहीत. ते भावनिकदृष्ट्या त्यांच्या आईवर खूप अवलंबून असतात आणि जर एखाद्या स्त्रीने त्यांच्या जीवनात केला तर तिच्यासाठी जागाच उरणार नाही.
 
कधीच गंभीर नसणारे पुरुष देखील चिंताची बाब असू शकतात. कारण जेव्हा आपल्याला त्याच्या समर्थनाची आणि मदतीची आवश्यकता असते तेव्हा तो हजर नसतो.