सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:20 IST)

मुलींच्या या 5 सवयी मुलांना मुळीच पटत नाही, दूर होऊ लागतात

स्पेस न देणे
नात्यात पडलं की मुलांनी प्रत्येक गोष्ट शेअर करावी ही मुलींची अपेक्षा लवकरच नात्यात दुरावा निर्माण करते. मुली मुलांच्या पर्सनल स्पेसमध्ये खूपच ढवळा ढवळ करतात. प्रत्येक नात्यात पर्सनल स्पेसची जागा असावी.
 
भावना व्यक्त न करणे
मुलींना वाटतं की प्रेमात मुलांनी काही न बोलता सर्व समजून घ्यावे. परंतू मुलांना भावाना समजणे ऐवढे सोपे जात नाही. मुलींची ही अपेक्षा की काही न बोलता मुलांनी सगळं समजून घ्यावं याने नात्यात दुरावा येतो. त्यापेक्षा स्पष्ट बोलणे कधीही योग्य ठरेल.
 
डॉमिनेटिंग स्वभाव
कोणतेही निर्णय घेताना मुलींचा हट्ट की त्यांची गोष्ट ऐकली पाहिजे हे स्वीकारणं अवघड होऊ लागतं. प्रत्येक गोष्टीत आपली निवड आणि निर्णय लादणे नात्यात दुरावा आणतो.
 
शंका घेणे
लहान-सहान गोष्टींवर शंका घेणे मुलांसाठी डोकेदुखी ठरतं. तू कुठे जातोस, कोणाला भेटतोस, सोशल मीडियावर एखाद्या व्यक्ती विशेषचे फोटो का लाइक करतो अश्या शंकांमुळे नातं तुटतं.