Dharma Sangrah

पार्टनरचा मूड ऑफ करतात आपल्या या सवयी

Updated: गुरूवार, 8 जुलै 2021 (18:12 IST)
 
सेल्फी
पुरुषांपेक्षा स्त्रियांना सेल्फी काढण्याचं अत्यंत वेड असतं. अशात सतत सेल्फी मूडमुळे पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतं. पार्टनरसोबत असला की गर्लफ्रेंडने त्याकडे लक्ष द्यावे अशी त्याची अपेक्षा असते. अशात सेल्फ ओरियंटेड वागणूक दुरी निर्माण करू शकते.
 
आर्टिफिशियल वागणूक
लक्ष वेधण्यासाठी जोरात बोलणे, जोरात हसणे, पार्टनरला माझा शोना, बाबू असे म्हणणे एखाद्याला धकत असलं तरी नेहमी-नेहमी अशी वागणुकीमुळे मूडची वाट लागते. आणि ही वागणूक स्वभावाविरुद्ध असली तरी नक्की दूर होण्यासाठी पुरेशी आहे.
 
ओव्हर पझेसिव्ह
आपलं प्रेम वगैरं आहे ते ठीक आहे परंतू त्याने आपल्याशिवाय इतर कुठेही वेळ घालवू नये ही अपेक्षा करणे योग्य नाही. सतत आपल्याकडे अटेन्शन देणे त्यासाठी शक्य नाही परंतू आपल्या या अपेक्षेमुळे तो पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो.
 
फॅमेली गॉसिप
आपल्या किंवा पार्टनरच्या कुटुंबातील सदस्यांचे अवगुणांची चर्चा किंवा दुसर्‍यांबद्दल सतत वाईट बोलत राहणे आपल्यातील नकारात्मकता दशर्वतं. याने पार्टनर कधीच खूश होणार नाही. अव्यवस्थित राहणे केस विस्कटलेले, व्यवस्थित कपडे न घालणे, आपल्या व्यक्तिमत्तावर खूप प्रभाव टाकतं. नीरस किंवा कंटाळवाणी वागणूक पार्टनरला स्वत:पासून दूर करते.
 
तुलना करणे
समोरचा आपल्यासाठी पझेसिव्ह आहे की नाही हे माहीत करण्यासाठी अनेकदा स्त्रिया दुसर्‍या पुरुषांचे कौतुक करत राहते. परंतू नेहमी- नेहमी असे करणे धोकादायक ठरू शकतं. कारण असा व्यवहार आपल्याला त्यात रस नाही असा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकतो. स्वत:ला लहान समजून मूर्खासारखे वागणे पार्टनरसोबत असला की मूर्खासारखे वागणे, लहान मुलांसारखे हठ्ठ करणे किंवा कोणत्याही गोष्टीत अक्कल न वापरणे हे त्याला एखाद्या वेळी कौतुकासारखे वाटू शकतं परंतू नेहमी अशी वागणूक असली तर कंटाळा येऊ शकतो.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुडघ्यांसाठी फायदेशीर ‘जानू नमन आसन’; योग्य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : जे मला प्रिय आहे

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

शतदा प्रेम करावे : मंगेश पाडगांवकर मराठी कविता

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments