Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिशय लोकप्रिय आणि आलिशान डिश; क्रीमी गार्लिक प्रॉन्स रेसिपी

Updated: मंगळवार, 9 जून 2026 (13:17 IST)
साहित्य-
प्रॉन्स (कोळंबी): २५० ग्रॅम (स्वच्छ केलेले आणि देव्हिन/Devined केलेले)
लसूण: २ ते ३ मोठे चमचे (बारीक चिरलेला)
बटर (लोणी): २ मोठे चमचे
ऑलिव्ह ऑईल किंवा रिफाइंड तेल: १ मोठा चमचा
फ्रेश क्रीम: १/२ कप (अमुल क्रीम किंवा दुधावरची घट्ट साय)
दूध: १/४ कप (ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी)
काळी मिरी पावडर: १ छोटा चमचा
चिली फ्लेक्स: १ छोटा चमचा
मिक्स हर्ब्स किंवा ओरिगॅनो: १ छोटा चमचा
कोथिंबीर किंवा पार्सले: २ मोठे चमचे (बारीक चिरलेली)
लिंबाचा रस: १ लहान चमचा
मीठ: चवीनुसार

कृती-
प्रॉन्स मॅरिनेट करणे: स्वच्छ धुवून घेतलेल्या प्रॉन्सला थोडे मीठ, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे बाजूला ठेवा.

प्रॉन्स परतून घेणे :एका पॅनमध्ये १ चमचा तेल आणि १ चमचा बटर गरम करा (फक्त बटर घातल्यास ते जळू शकते, म्हणून थोडे तेल घालावे). तेल-बटर गरम झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेले प्रॉन्स घाला. मध्यम ते उच्च आचेवर प्रॉन्स दोन्ही बाजूंनी फक्त २ ते ३ मिनिटे परतून घ्या, जोपर्यंत त्यांचा रंग हलका गुलाबी/केशरी होत नाही. प्रॉन्स जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ते रबरासारखे चामट होतात. परतून घेतलेले प्रॉन्स एका प्लेटमध्ये काढून घ्या.
ALSO READ: क्रीमी चिकन अल्फ्रेडो पास्ता रेसिपी
क्रीमी गार्लिक सॉस तयार करणे: त्याच पॅनमध्ये उरलेले १ चमचा बटर घाला. बटर वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला आणि मंद आचेवर १ मिनिट परता. लसणाचा कच्चा वास जाऊन छान सुवास सुटेपर्यंत परता (लसूण जळू देऊ नका). आता गॅस अगदी बारीक करा किंवा बंद करा आणि पॅनमध्ये फ्रेश क्रीम आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. गॅस पुन्हा मंद आचेवर चालू करा. या सॉसला हलकी उकळी येऊ द्या. त्यानंतर यात चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, उरलेली काळी मिरी पावडर आणि चवीनुसार थोडे मीठ घाला (लक्षात ठेवा बटर आणि मॅरिनेशनमध्येही मीठ होते, त्यामुळे मीठ बेतानेच टाका).

प्रॉन्स एकत्र करणे: सॉस थोडा घट्ट होऊ लागला की, त्यामध्ये आधी परतून घेतलेले प्रॉन्स (त्याच्या रसासह) घाला. मंद आचेवर प्रॉन्स आणि सॉस एकत्र करून १ ते २ मिनिटे शिजवून घ्या, जेणेकरून लसूण आणि क्रीमची चव प्रॉन्समध्ये व्यवस्थित उतरेल. शेवटी गॅस बंद करा आणि वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पार्सले भुरभुरा. तुमचे गरमागरम आणि रिच क्रीमी गार्लिक प्रॉन्स तयार आहेत! हे तुम्ही स्टार्टर म्हणून कोरडे खाऊ शकता किंवा गार्लिक ब्रेड, बटर नान किंवा स्टीम राईससोबत मेन कोर्स म्हणून सर्व्ह करू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

उपवासासाठी एक उत्तम आणि चवदार रेसिपी ''Green Sabudana Vada''

शौचातून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका गंभीर आजारांचे लक्षण होऊ शकतात

Power Grid Vacancy : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २७० शिकाऊ पदांसाठी भरती, अर्ज २५ ऑगस्टपासून सुरू; पात्रता जाणून घ्या

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments