बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (12:09 IST)

एग रोस्ट

एग रोस्ट बनविण्याचे सामग्री-
उकडलेली अंडी – 4, कांदे बारीक चिरलेले -2 कप, हिरव्या मिरच्या 5, टोमॅटो 2, लाल तिखट -1 चमचा, धनेपूड – 1 चमचा, हळद-1/2 चमचा, गरम मसाला-1 चमचा, आले –लसूण पेस्ट –1 चमचा, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, तेल, मीठ, मोहरी. 
 
एग रोस्ट बनविण्याची कृती-
सर्वप्रथम तीन चमचे तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला. आता ह्यात कढीपत्त्याची पाने आणि आलं-लसूण पेस्ट घाला. थोडावेळ ढवळा. कांदा लालसर होईपर्यंत परता. हिरव्या मिरच्या घाला आणि परत ढवळा. आता धनेपूड, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घाला.पुन्हा व्यवस्थित ढवळा. थोडे पाणी घाला आणि पुन्हा ढवळा. आता तुम्ही मीठ आणि कापलेले टोमॅटो घालू शकता. तीन मिनिटे हे मिश्रण शिजवा. जेव्हा हे ऊकळेल तेव्हा त्यात उकडलेली अंडी घाला आणि परत तीन मिनिटे ढवळा. आता अजून थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित एकत्र करा.
 
एग रोस्ट कोथिंबीर घालून सजवा आणि गरमगरम वाढा.