बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 (17:16 IST)

तंदुरी चिकन टाकिटो रेसिपी

Tandoori Chicken Taquito
साहित्य-
चिकन ब्रेस्ट - 200 ग्रॅम
डेलमोंटे तंदुरी मेयोनेज - पाच टेबलस्पून 
गव्हाच्या पोळ्या - चार 
अर्ध्या लिंबाचा रस
काळी मिरी पावडर -एक टीस्पून 
चवीनुसार मीठ
लेट्यूस
 
कृती-
तंदुरी चिकन टाकिटो रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी चिकन ब्रेस्ट स्वच्छ धुवून घ्यावे  यानंतर, चिकनचे पातळ काप करावे.आता मीठ, काळी मिरी पूड, डेलमोंटे तंदुरी मेयोनेज घालून मॅरीनेट करावे आणि 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. ओव्हन 170 अंशांवर प्रीहीट करा. चिकन स्ट्रिप्स अल्युमिनियम फॉइलवर ठेवा आणि सात मिनिटे बेक करा. त्यानंतर, रोटीवर काही लेट्यूसची पाने ठेवा. त्यावर तंदुरी चिकन स्ट्रिप्स ठेवा, ते रोल करा. तर चला तयार आहे आपली तंदुरी चिकन टाकिटो रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik