मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2025 (13:44 IST)

चिकन साटे रेसिपी

Chicken Satay
साहित्य-
चिकन - 250 ग्रॅम
शेजवान सॉस - एक टीस्पून
मैदा - दोन चमचे
कॉर्न फ्लोअर - तीन चमचे
सोया सॉस - एक टीस्पून
व्हिनेगर - एक चमचा
मीठ चवीनुसार
तेल  
टोमॅटो प्युरी - एक टीस्पून
आले लसूण पेस्ट - एक टीस्पून
मध - एक चमचा
तीळ - एक चमचा
तिखट - एक टीस्पून
पाणी
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये मैदा घ्यावा. आता त्यामध्ये मीठ, तिखट, आले-लसूण पेस्ट सर्व मसाले घालून चांगल्याप्रकारे मिक्स करा. नंतर टोमॅटो प्युरी, सोया सॉस, मध आणि शेझवान सॉस घालून पीठ तयार करावे आणि बाजूला ठेवा. तसेच आता चिकन स्वच्छ करवून ते चांगले धुवून घ्यावे आणि वाळल्यानंतर चिकन तुकडे करून घ्यावे. बारीक केल्यानंतर आता गॅसवर पॅन ठेऊन त्यामध्ये तेल घालावे. यानंतर चिकनचे तुकडे त्यामध्ये घालावे. तसेच ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. आता ते एका प्लेटमध्ये काढून वर तीळ घालावी. तर चला तयार आहे चिकन साटे रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik