- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - मांसाहारी
अंड्याचे आमलेट
साहित्य : सहा अंडी, कोथिंबीर, एक छोटा कांदा, जीरे, मोहरी हिरव्या मिरच्या 6, कांद्याची हिरवी पात. कृती : गॅसवर सपाट तवा ठेवावा. जीरे, मोहरी तेलात उकळावे. अंड्याच्या द्रावणात जीरे, मोहरी, हिरवी कोथिंबीर, बारीक कापलेला कांदा, हिरव्या मिरच्या टाकून संपूर्ण द्रावण चमच्याने चांगले फेटून घ्यावे. गॅसची आच मंद ठेवावी. तवा तापल्यावर शेंगदाण्याचे तेल समप्रमाणात पसरवून घ्यावे. पातेल्यात फेटलेले अंड्याचे द्रावण खोलगट चमच्याने तव्यावर पोळीच्या आकारात पसरट पसरवावे. एका लहान वाटीत तेल घेऊन छोट्या चमच्याने अंड्याच्या पोळीवर घालावे. एक मिनिट तव्यावर पोळी भाजल्यानंतर परतवून घ्यावी व दुसर्या बाजूने एक मिनिटभर भाजावी. अशाप्रकारे चविष्ट ऑमलेट तयार! ब्रेड तव्यावर अमूल बटर टाकून भाजून घ्यावे. ऑमलेट भाजलेल्या ब्रेडमध्ये ठेवून खाण्यासाठी द्यावे. चवीसाठी टोमॅटो सॉस घ्यावा.