चिकन कर्ड विथ पेपर
|
कृती : 1 किलो चिकन लिंबाच्या रसासोबत थोडंस मीठ टाकून मॉरिनेट करावे. एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून गोड लिंबाचे पान आणि जीरं टाकावे. गरम झाल्यावर काळेमीरे, कलमी, लवंगा, वेलची पूड व मीठ टाकून चिकनचे मॅरिनेट केलेले तुकडे टाकून हालवावे. दीड कप पाणी टाकून आटेपर्यंत ते शिजवावे.
नंतर दह्याला फेटून घ्यावे. एक मोठा चमचा तेल घेऊन त्यात गोड लिंब, खड्या लाल मिरच्या, जीर्याला गुलाबी होईस्तोर परतावे त्यात दही टाकावे मग त्यात शिजलेले चिकन टाकून गार झाल्यावर सर्व्ह करावे.
