कृती : चिकनला धुऊन स्वच्छ करावे व एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर पेपर सॉल्ट आणि तेल लावून ठेवावे. नंतर त्या चिकनला कॉर्नफ्लोरमध्ये गुंडाळून ठेवावे. एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकन शिजवावे. 5 मिनिटानंतर त्यात बटर व स्लाइस मशरूम टाकावे. नंतर 1/2 कप पाणी टाकून त्याला शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर चिकनला बाहेर काढून ठेवावे आणि पॅनमध्ये मारसाला वाइन टाकून शिजवावे. 5 मिनिटानंतर त्यात चिकन टाकून चांगले एकजीव करावे. सर्व्ह करताना आधी चिकन ठेवावे व त्यावर सॉस टाकावे.