शुक्रवार, 3 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

पोर्क विंडील

(विंडालू-पोर्क करी-गोवा पद्धत)

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 25 अख्ख्या सुक्या लाल मिरच्या 1 कप विनेगरमध्ये 2 तास भिजवून आणि विनेगर निथळून राखून ठेवलेले. 15 ग्रॅम आले, 8 पाकळ्या लसूण, 2 तुकडे दालचिनी, 8 लवंगा, 1 मोठा चमचा जिरे, 5 मोठे चमचे वनस्पती तेल, 3 मोठे कांदे चिरलेले, दीड किलो पोर्क 5 से. मी. चे तुकडे केलेले, 1/2 छोटा चमचा हळद, 4 छोटे चमचे मीठ, 1/2 पाणी.

कृती : मिरच्या, आले, लसूण, दालचिनी, लवंगा आणि जिरे यांचे, अधुनमधुन, मिरच्या भिजवलेले विनेगर थोडे घालत, वाटण तयार करा. सारे विनेगर वापरा. कुकरमध्ये तेल साधारण 3 मिनिटे गरम करा. कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. मांस, वाट, हळद पूड आणि मीठ घाला. ढवळा आणि साधारण 5 मिनिटे परता. पाणी घाला एकदा ढवळा. 8 मिनिटे शिजवा. नंतर कुकर थंड करत ठेवा. कुकर उघडा गरम गरम वाढा.