गुरूवार, 26 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

फिश बॉल सूप

फिश बॉल सूप मांसाहारी व्यंजन
साहित्य : 500 ग्रॅम सुरमई मासोळी, 2 जुडी कांदे, 1 पत्तागोबी, 1 काडी सेलरी, थोडीशी वरमीसेली, 4 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 अंडं, 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर काळे मिरे व एम. एस. जी.

कृती : सर्वप्रथम मासोळीला कापून त्यातील पूर्ण मीट व काटे काढून घ्यावे. मासोळीच्या मीटमध्ये 1 अंडं, 1 मोठा चमचा तेल, कार्नफ्लॉवर, मीठ, मिरे आणि एम. एस. जी. टाकून मिक्सरमधून काढून घ्यावे.

एका पॅनमध्ये 8 कप पाणी गरम करावे व तयार केलेल्या मिश्रणाचे बॉल्स (गोळ्या) बनवून गरम गरम पाण्यात टाकावे. जेव्हा सर्व बॉल्स शिजून वर येतील तेव्हा त्यात कापून ठेवलेली पत्ता गोबी, सेलरी, वरमीसेली, कांदा, मीठ घालून उकळावे व गरम गरम सर्व्ह करावे.