शुक्रवार, 27 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

बोंबील

बोंबील मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 8-10 बोंबील, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, मीठ, तांदळाचा बारीक रवा तेल.

कृती : बोंबील डोक्याकडून कापून घेऊन उभा चिरून काट्याकडून फ्लॅट करून घ्यावा. धुऊन मीं लावून ठेवावा. नंतर दाबून सर्व पाणी काढून टाकावे. त्यास हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबीलला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावे व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने तळून गरम गरम सर्व्ह करा.