गुरूवार, 26 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

मिनरस्ट्रोन सूप

मिनरस्ट्रोन सूप
PR
साहित्य : 1 कप पाणी, 1/2 कप हॅरिकॉट बीन्स 1 कप पाण्यात 4 तास भिजवलेले, 1 मोठा चमचा तेल, 1 मोठा कांदा चिरलेला, 3 पाकळ्या लसूण चिरलेला, 1 मोठे गाजर चिरलेले, 1 लहान सलगम चिरलेले,1 मध्यम टोमॅटो पाण्यात शिजवून साल काढून चिरलेला, 1 कप कोबी चिरलेला, 1 मोठा चमचा सेलरी चिरलेली, 1/4 छोटा चमचा मिरे पूड, 1 मोठा चमचा मीठ, 5 कप कोंबडीचे सत्व, 1/2 कप मॅकरोनी, 1/2 कप चीज किसलेले.

कृती : बीन्स आणि पाणी कुकरमध्ये ठेवून 15 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर कुकर उघडा, पाणी निथळून टाका. बीन्स बाजुला ठेवा. कुकर धुवून स्वच्छ पुसा. कुकरमध्ये तेल मध्यम आचेवर साधारण 2 मिनिटे गरम करा. ताबडतोब कांदा, लसूण, गाजर आणि सलगम घाला. ढवळा आणि साधारण 2 मिनिटे परता. मॅकरोनी आणि चीजसोडून इतर सारे पदार्थ घाला. उकळी येऊ द्या. मॅकरोनी घाला. कुकर बंद करून 5 मि‍‍िनटे शिजवा. सर्व्ह करताना वरून चीज पेरा.