1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

स्वीट कॉर्न अँड चिकन सूप

स्वीट कॉर्न चिकन सूप
PR
साहित्य : 350 ग्रॅम कोंबडीचे तुकडे, 6 1/2 कप कोंबडीचे सत्व, 2 कप क्रीम स्टाईल कॉर्न, 1 हिरवी मिरची चिरलेली, 2 मोठे चमचे सोया सॉस, 1 लहान चमचा मोनो-सोडियम-ग्लुटामेट, 1 मोठा चमचा विनेगर, 1 मोठा चमचा मीठ, 2 अंडी घुसळलेली, 1/2 कप पाणी, 6 मोठे चमचे कॉर्नफ्लावर.

कृती : कोंबडीचे सत्व कुकरमध्ये घाला. कोंबडीचे तुकडे घालून 10 मिनिटे शिजवा. कुकर थंड झाल्यावर उघडा. कोंबडी काढा आणि हाडे काढून टाकून कोंबडीचे बारीक तुकडे करा. कोंबडीच्या सत्वासह कुकर प्रखर आचेवर ठेवा. कोंबडी घाला आणि अंडे, पाणी, कॉर्नफ्लावर सोडून इतर सारे पदार्थ घाला. उकळी येऊ द्या.

अंडे बारीक धारेने सोडा काट्याने सतत ढवळत रहा. कॉर्नफ्लावर एकजीव होईपर्यंत हळूहळू पाणी घाला. हे मिश्रण कुकरमध्ये घालून ढवळा. सतत ढवळत सूप दाट होईपर्यंत उकळवत रहा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा