बघता बघता हे ही वर्ष संपलं
बघता बघता हे ही वर्ष संपलं,
दिनदर्शिकेला बदलवाय च काम हाती आलं,
जुने जाऊन, भिंतीवर नवं जाऊन बसलं,
चढताना उगीचच जुन्यावर कुत्सितपणे हसलं.
म्हणाला येड्या तू काही चांगला नव्हता,
वर्षभरात खुशी नव्हती, फक्त वाढवल्या चिंता,
जुनं म्हणाले अरे वेड्या तुही गमज्या नको करू,
नवीन वर्ष होऊ तर दे आता सुरू,
मी काय करू शकतो, नियती पुढं हतबल,
विळख्यात सापडलो सारे, पडलो निश्चल,
हे आता मात्र खूप झाले साऱ्यांचे सोसून,
ये आता, अन कर काही तू पुढं होऊन,
विळख्यातून सुटका कर , मोकळा श्वास घेऊ दे,
तुझ्या नावावर तरी यंदा च यश असू दे!
..अश्विनी थत्ते