मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (05:31 IST)

जा बाळे जा, सुखे सासरी

marathi kavita ja bale ja sukhe sasari
जा बाळे जा, सुखे सासरी.........
 
जा बाळे जा, सुखे सासरी
नको गुंतवू मन माहेरी
 
भाग्यवती तू मुली खरोखर
लाखामधले एक मिळे घर
पणावाचुनी पूर्ण स्वयंवर
पुरुषार्थाची होसी सहचरी
 
शब्दांवाचून असते भाषा
जाण पतीचे भाव, मनीषा
सखी सचिव तू होई शिष्या
वडील गुरुंची करी चाकरी
 
तुझा लाडका अल्लड वावर
आता कुठुनी माझ्या घरभर
द्राक्षरसाचा मधूर तुझा स्वर
पडेल कानी कुठुनी दिनभरी
 
- ग.दि.माडगूळकर