बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (20:25 IST)

तुझी कविता

love
शब्दांना तुझ्या अर्थ देते 
स्वप्नांना तुझ्या रंग देते 
भासांना  ही मूर्त करते 
क्षणा क्षणाला जिवंत करते 
तुझी कविता .....
 
मन हे माझे जिंकूनी घेते 
भावने चा उद्रेक करते 
मनात आशा भरुनी जाते 
रंग चहुकडे विखरून जाते 
तुझी कविता ....
 
तुझेच अनुभव रंग तुझे 
तुझीच प्रेरणा छंद तुझे 
मुक्त तू स्वच्छंद तू 
क्षणा क्षणाला जगतोस तू 
तुझी कविता
 
शिल्पा मोघे-