1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (18:14 IST)

जसं मनाला येईल तसंच वागत फिरतात

जाणिवा बोथट होतात का म्हणून लोकं असं करतात,
जसं मनाला येईल तसंच वागत फिरतात,
काहीच वाटत नसेल का त्यांना आतरंगातून,
कुणी दुखवतोय आपल्या वर्तणूकीतून,
अश्यानीच तर बेफिकिरी वाढीस लागते,
माणुसकीच्या मापदंडातुन व्यक्ती सुटत जाते,
सर्वचजण असं करायला लागले तर कसं बरं होईल?
चांगल्या वाईटाची व्याख्या कोण नक्की सांगेल?
अंकुश तर बसायलाच हवा न ह्यावर,
तेंव्हाच तर होईल जपणूक, सगळं होईल स्थिरस्थावर.!
..अश्विनी थत्ते