आला आला शीत ऋतूचा आनंद बहार!
पानावरती दवाचे थेंब रेंगाळू लागले,
पहाटे स गुलाबी स्वप्ने पडू लागले,
चाहूल दिली तिनं हलकी हलकीशी,
प्रत्येकला वाटे तीच हवीहवीशी,
स्वागतास आतुर अतीव सारे झाले,
हव्याहव्याशा गुलाबी थंडी चे आगमन जाहले,
बागेमध्ये फुलं पान डवरून डोलतात,
थुईथुई कारंजावर फुलपाखरे नाचतात,
धुक्याची चादर घेऊन वनश्री ही तयार,
आला आला शीत ऋतूचा आनंद बहार!
..अश्विनी थत्ते