1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. marathi poem

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!

kavita swarti
काही मंडळींच हे आपलं बरं असतं,
त्यांच्या अडचणीत कुणी मदतीला यावं वाटत,
कुणी आलं नाही तर दुसरे एकदम वाईट ठरतात,
आपण कधी कामी पडलो का ?हे प्रश्न मनास ना पडतात!
द्यावं लागतं हो दुसऱ्यास काही न काही सतत,
तेंव्हाच ते ही पडतात कामी, हे उगाच नाही होत,
हाच तर धर्म निसर्गाने ठरवून दिला आहे,
जे तुम्ही पेरलं ते च तर उद्या उगवणार आहे,
तेव्हा वेळीच सावरा मंडळी स्वतः ला,
द्या दुसऱ्या साठीही कधी कधी स्वतः ला,
आपल्या पुरतं तर सगळेच रोज जगतात,
पण इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
..अश्विनी थत्ते
,
पुढील लेख
Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे कोरफडाचं सेवन करा, काही दिवसातच फरक दिसेल