Marathi Kavita रोजचं काही ना काही माणूस शिकतो
रोजचं काही ना काही माणूस शिकतो,
काल काल पर्यंत जे नाही जमलं, ते जमवतो,
अंतर्मनात उलथापालथ सुरूच असते,
बाल मन असलं तरीही ही प्रक्रिया सुरू असते,
मग त्यातूनच साध्य होते प्राप्त करण्यासाठीची धडपड,
कधी कधी प्रयत्न चोरून, तर कधी उघड उघड,
पण मात्र खरा फरक पडतो केंव्हा, जे प्राप्त करायचंय ते चांगलं नसेल तेव्हा,
मग खरा खेळ प्रारंभ होतो जीवनाचा,
काय चांगलं काय वाईट, ते ओळखण्याचा!
....अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi