वाचाल तर वाचाल ह्या युक्तीस सार्थ करण्याची!
चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात,
हळूहळू त्या अंगवळणी पडत असतात,
वाचायला शिकतो बालपणीच आपण,
चांगलं साहीत्य वाचायची सवय जडावी लागते पण,
वाचवते वाचन येणाऱ्या सर्व परिस्थिती तुन,
मार्ग सापडतोच चांगल्या वाचनातून,
विविध विषय, विचार लीलया हाताळतो,
महान लेखकांच्या विचारांचे मंथन करतो,
आहे न अमाप सम्पदा पुस्तकांची,
काढा सवड, अन जपा आवड साहीत्य वाचनाची,
एक चांगला सखा सोबती एक पुस्तक होते,
आयुष्याच्या प्रवासात त्याची अमूल्य सोबत होते,
तर करा विचार गांभीर्याने, अन धरा कास वाचनाची,
वाचाल तर वाचाल ह्या युक्तीस सार्थ करण्याची!
..अश्विनी थत्ते