गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

National Girl Child Day 2024 : असावी प्रत्येक घरी एक लेक

International Girl Child Day
तिच्यात परमेश्वराने दिली आहे सृजनशीलता,
वरदान हे एक परम , आभार त्याचे, सिद्ध केली पात्रता,
एक बालिका म्हणून जन्म घेते पित्याकडे,
धनाची पेटी म्हणून कधी स्वागत, तर कधी कुणाचे तोंड वाकडे,
घरच अंगण मात्र थुईथुई नाचतं,  असली की,एक मुलगी घरात,
येतं चैतन्याला उधाण, तिच्या प्रेमळ सानिध्यात,
आई पण तिचं बालपण जगते, लेकी सोबत,
बोबडे कौतुकाचे बोलाने घरी प्रसन्नता येते,
बापाची ती विशेष लाडकी, कोडकौतुक करवून घेते,
सासरी गेली की दोन्ही घराची मानमर्यादेच भान ठेवते,
सासर माहेर ती मात्र लीलया सांभाळते,
असावी प्रत्येक घरी एक लेक, लळा लावायला,
सृजनतेचं देणं , हळुवारपणे सांभाळायला!
..अश्विनी थत्ते.