मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (08:21 IST)

शब्दाची नाही गरज, येतं नृत्यास बांधता!

भाव, कला गुणांचा संगम नृत्यातून,
जीवनाचे विभिन्न रंग प्रतीत होती त्यातून,
लय अन ताल ज्यातून निनादतो,
उन्मुक्त आनंद त्यातूनच गवसतो,
व्यक्त होण्याचे अभिन्न अंग मानवाचे,
भाषे ची गरज कधी अडसर न याचे,
अंग अंग नाचू लागते लयीवर स्वार होऊन,
थिरकू लागतात पाय, गाण्याचे बोल ऐकून,
सान थोर असा कदापी न भेद ज्यात,
उडू लागताच कारंजे, भिजू लागतात त्यात,
जगातील ही एकमेव भाषा की उमगे न बोलता,
शब्दाची नाही गरज, येतं नृत्यास बांधता!
...अश्विनी थत्ते.