मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (08:01 IST)

ओटीत घातली मुलगी विहिणबाई........

ग.दि.माडगूळकर मराठी कविता
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
 
ओटीत घातली मुलगी विहिणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी
 
वधुमाय तुम्ही ही तुम्हां सारे ठावे
वाटते तरीही आर्जवुनी सांगावे
मी पदर पसरते जन्मदायिनी आई
 
माहेर आपुले सत्पुरुषांच्या वंशी
सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी
पाठिशी आपुल्या नित्य उभी पुण्याई
 
लाडकी लेक ही माझी पहिली-वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली
तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठायी
 
 
- ग.दि.माडगूळकर