गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (13:10 IST)

. ..तु आणि मी

तु अडथळ्यांचे बांध बांधून ठेव
मी जलधार बनून वाहत राहिल.
गढूळपणाचे लांछन लावून ठेव
मी निर्मळ बनून जन्मत राहील.
 
तु क्षितिजांनी मला संपवत रहा
मी आकाश बनून विहरत राहील
क्रुष्णमेघांनी व्यापून कलुषत रहा
मी गर्जना बनून बरसत राहील
 
तु दुष्काळी भेगांनी चिरवत जा
मी अंकुर बनवून उगवत राहील
करपलेल्या हातांनी चिरडत जा
मी हीरवळीत नव्याने बहरत राहील
 
तु अग्निदिव्याने जाळून टाक
मी मंद शलाकेत उजळत राहील
वादळ वार्याचा कीतीही दे धाक
मी निर्भयपणे तेवत राहील.. 
 
....................प्रेमानंद तायडे
नगरदेवळा, ता.पाचोरा जि.जळगाव