मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (13:43 IST)

पेरणी चालू आहे...काय पेरायच हे आपलं आपणच ठरवायचं

लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासून घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासून सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासून घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.
 
तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मूल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मूल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
"आपण एक दाणा पेरला असता, आणि निसर्गापासून एकच दाणा परत मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 
 
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं. पण निसर्गाने माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 
 
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!