शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 जुलै 2022 (11:36 IST)

आषाढी एकादशी व्रत कथा आणि पूजा विधि

aashadhi ekadashi 2021
देवशयनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते. दशमीला रात्रीच्या जेवण्यात मीठ खाणे टाळावे. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कार्य आटपून व्रत संकल्प घ्यावा.
 
विठोबाची मूर्ती आसानावर विराजित करुन त्यांची वि‍धीपूर्वक पूजा करावी. पंचामृताने स्नान घालावं. नंतर देवाची धूप, उदबत्ती, दीप, पुष्प इतर सामुग्रीने पूजा करावी.
 
देवाला समस्त पूजन सामग्री, फळ, फुलं, सुके मेवे, मिष्ठान अर्पित करुन मंत्र द्वारा स्तुती करावी. याव्यतिरिक्त शास्त्रात सांगण्यात आलेले सर्व नियम पाळावे.
 
आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.
 
आषाढी एकादशी पूजा विधी
एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे किंवा रात्रीच्या जेवण्यात मिठाचे सेवन टाळावे.
एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विठ्ठल पूजन करावे.
देवाला पिवळे वस्त्र, पिवळे फुलं, पिवळे फळं, पिवळं चंदन अर्पित करावं.
त्यांचे हात शंख, चक्र, गदा आणि पद्म सुशोभित करावे.
देवाला विडा आणि सुपारी अर्पित केल्यावर धूप, दीप याने आरती करावी.
 
या मंत्राचा जप करावा
‘सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदम्। विबुद्धे त्वयि बुद्धं च जगत्सर्व चराचरम्।।'
 
अर्थात हे जगन्नाथ! आपके निद्रेत गेल्याने संपूर्ण विश्वाला निद्रा लागते आणि आपण जागृत झाल्यावर संपूर्ण जग आणि चराचर जागृत होऊन जातं.
 
हा संपूर्ण दिवस उपवास करावा.
रात्री हरिभजन करत जागरण करावं.
रात्री देवाचे भजन व स्तुती करावी.
विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा.
यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.
आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं करावं.
या दोन्ही दिवशी देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.