रविवार, 22 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

जीवन सागर

सौ. स्वाती दांडेकर

जीवन सागर
ND
जीवन असे हे सागरापरी
किती तरी रम्य विशाल अनुप
अनेक आठवणी बालगीत उराशी
कधी असे भरती कधी असे ओहटी
जीवन असे ही तडजोड शेवटी
घेत असते परिक्षा कर्तव्याच
त्यागाची नाव घेऊनी
कर्तव्याची पतवार लावुनी
विश्वासाची साथ घेऊनी
पार करावी जीवन नैया.