शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शनिवार, 27 डिसेंबर 2014 (15:35 IST)

हा मार्ग ऐकटीचा

अंधारा कडून उजेडाकडे तुझी वाटचाल होती
अवघड भूमिवूरी तुझी पाऊले कणखर होती
पाऊल वाटेवरी काटयांची बरसात होती
रक्ताळलेल्या पाऊलांना मायेची पाखर पण नव्हती
तरी कधी न थकली, कधी न परतली 
शेवटी पायवाटांनी माघार घेतली
अंधारा कडून उजेडा कडे तुझी वाटचाल होती
 
दैवाच्या आघातानी कण्यानी तू मोडली होती
मोडक्या कण्यानी, थिजलेल्या नेत्रांनी,
ताठ मानेनी जगण्याची झुंज होती
चिमणिच्या पंखा खाली पिल्लांची जीवनवाढ होती
करपलेल्या उन्हाळयात ही जगण्याची जिद्भ होती
अंधारा कडून उजेडा कडे तुक्षी वाटचाल होती
 
आनंदते मन आता, भारावते लेखणी
यश जीवनपट तुझा लिहीताना
यशस्वी झाला मार्ग ऐकटीचा
सुयश लाभले जीवनाला
नित वसंत बहरो जीवनी तुमच्या
देवाशिष लाभो सर्वाना
हिच माझी मंगलकामना. 
 
 
सौं.स्वाती दांडेकर
9425348807