शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By डॉ. उषा गडकरी|

हुंकार

हुंकार
ND
हिरवा मरवा
ओढ्याचा गारवा
फुलला मोगरा
मनाला विसावा

गुलाबाची ताटी
सुगंधाची दाटी
पिवळी शेवंती
विरक्तीची अनुभूती

जाईजुई उमलल्या
वृक्ष-वेली बहरल्या
सुगंध मातीला
तोषवी चित्ताला

आकशीचा ओंकार
धरतीचा हुंकार
दश-दिशा अनावर
जीव झाला अलूवार.